Post office requirements 2025 : नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये पोस्ट ऑफिस भरती बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. 2017 पासून प्रत्येक वर्षी पोस्ट ऑफिस मध्ये भरती काढले जात आहे आणि ते पण बिना परीक्षा देता पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला मिळत आहे. तर ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये केंद्र सरकारने पोस्टात 25 हजार 200 एवढ्या जागांची बंपर भरती काढली आहे तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्या. कारण या भरतीसाठी कोणती परीक्षा घेतली जाणार नाही दहावीच्या गुणपत्रिकेवरून ज्याला जास्त टक्केवारी असेल त्याला या भरतीमध्ये संधी मिळणार आहे.
फॉर्म कधी चालू होतील.
ग्रामीण डाक सेवक फॉर्म 3 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे तर जे ग्रामीण डाक सेवक मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी फॉर्म भरून घ्यावे. 28 मार्च 2025 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल.
जे ग्रामीण डाक सेवक फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असेल उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी आपला फॉर्म भरून घ्यावे.
वयोमर्यादा
ग्रामीण डाक सेवक मध्ये इच्छुक असणारे उमेदवारांची वयोमर्यादा ही 18 ते 40 च्या दरम्यान असली पाहिजे.
तसेच सरकारने प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षण दिलेले आहे तर त्याच्यानुसार अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी 5 वर्षाचे सूट दिलेली आहे. तर ओबीसी साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. आणि अपंगांसाठी दहा वर्ष सूट दिलेली आहे.
शुल्क किती
तर प्रत्येक प्रवर्गासाठी सरकारने शुल्क मध्ये पण आरक्षण दिलेले आहेत. सामान्य ओबीसी ई डब्ल्यू एस या उमेदवारांसाठी केंद्र सरकारने 100 एवढी शुल्क भरण्यास सांगितले आहे आणि अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील उमेदवारांसाठी केंद्र सरकारने भरायला सांगितले नाही.
वेतन किती मिळणार
ग्रामीण डाक सेवक मध्ये जर उमेदवारांना जॉब भेटला तर त्यांना मासिक वेतन सुरुवातीला 10,000 एवढे भेटणार आहे. होत जाईल तसतसा त्यांचे वेतनात वाढ केली जाईल. जसं की 10 हजार ते 29 हजार पर्यंत त्यांचे वेतनात वाढ होईल. आणि त्यांना भविष्यात प्रमोशन पण मिळवण्याची संधी असते. कारण प्रमोशनसाठी त्यांची एक्झाम घेतली जाते आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर त्यांचे प्रमोशन होते आणि त्यांचे वेतन मध्ये वाढ होते. तसेच पगाराबरोबरच त्यांना अतिरिक्त भत्ते दिले जाते.
पात्रता काय असेल
- उमेदवाराची वय 18 ते 40 पर्यंत असावे
- गणित आणि इंग्रजी मधून दहावी उत्तीर्ण असावे
- संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे
- किंवा संगणकचे अनुभव असावे.
तर ग्रामीण डाक सेवक मध्ये जॉब मिळवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्या कारण हे जॉब मध्ये कोणत्या प्रकारे परीक्षा घेतली जाणार नाही दहावीच्या गुणांकावर निवड होणार आहे तर तुम्ही या वेकेन्सी मध्ये आवश्यक फॉर्म भरा.
तुम्ही हा लेख तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि त्यांना पण या संधीचा फायदा घेऊ द्या.
तर असे जॉब रिलेटेड योजना न्यूज ऑनलाईन अप्लाय बद्दल माहिती बघण्यासाठी तुम्ही आमच्या पोर्टलला सतत भेट देत राहा जेणेकरून तुमच्यापर्यंत अनेक गोष्टींची माहिती होईल.